संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडे शिवसेनेच्या संसदीय नेतेपदाची जबाबदारी
शिवसेनेत फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदार तर 18 पैकी 13 खासदारही शिंदे गटात सामिल झाले. त्यामुळे, शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात होती
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले आहे. राऊत यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. तर राऊत यांच्या जागी किर्तीकर यांची नियुक्ती व्हावी असं पत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं होतं. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदार तर 18 पैकी 13 खासदारही शिंदे गटात सामिल झाले. त्यामुळे, शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात होती. तर आता राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. यामुळे ही नियुक्ती ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.
Published on: Mar 23, 2023 02:14 PM