कबड्डीचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांना काय सुचवायचं आहे? खेचा खेची! फोडा फोडी! शेवटी.. शरणागती.. याचा काय अर्थ
दरम्यान मविआमधील उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा येत असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मविआच्या भवितव्यावर भाष्य केल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाची कालच पाचोरा येथे सभा झाली. त्यातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली. त्यांच्या या टीकेला आज भाजपसह शिंदे गटाचे नेते प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान मविआमधील उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुरावा येत असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मविआच्या भवितव्यावर भाष्य केल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात असे वेगळ्या दिशेने राजकारण सुरू असतानाच संजय राईत यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे सगळेच बुचकाळ्यात पडले आहेत. तर त्यांच्या या ट्विटमुळे वेगळ्या चर्चा सुरू आहेत. राऊत यांनी, महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण.. खेचा खेची! फोडा फोडी! शेवटी.. शरणागती.. जय महाराष्ट्र! असे ट्विट केलं आहे. सोबत त्यांनी कबड्डीचा फोटो वापरला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा नेमका रोख कोणाकडे आहे. त्यांना नेमक काय सांगायचं आहे. यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.