‘पैशाचा खेळ करून कोणाही मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधानही होऊ शकतो’; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jul 10, 2023 | 3:08 PM

त्यांनी त्यांच्या अमरावती दौऱ्यात आधी पत्रकार परिषद आणि त्यानंतर सभेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा. अमरावतीत विश्राम भवनात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे

अमरावती : ठाकरे गटाचे प्रमुख तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या अमरावती दौऱ्यात आधी पत्रकार परिषद आणि त्यानंतर सभेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा. अमरावतीत विश्राम भवनात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना, पूर्वी सरकार हे मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं अशी, खोचक टीका केली आहे. तसेच तुम्ही मतदान कोणालाही करा सरकार माझंच येईल असं बोलणं, तसा पायंडा पाडणं योग्य नाही. तर दमदाट्या किंवा पैशाचा खेळ करून या राज्यात मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान कोणीही होईल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘राइट टू रिकॉल’ हे सांगितलं होतं. त्या प्रमाणे लोक प्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे. त्यावर विचार व्हायला हवा असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 10, 2023 03:07 PM
“माझं वय नाही, मग मला का टार्गेट करता?”, रोहित पवार यांचा छगन भुजबळ यांना खोचक सवाल
उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हा मतदारांचा कौल …”