उद्धव ठाकरे यांनी पोडली डरकाळी, म्हणाले, ‘प्रभोधनकार ठाकरे यांनी दिलेलं नाव मी देणार नाही’
यवतमाळ येथील पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तर आज त्यांनी अमरावतीत सभा घेत शिंदे गटासह निवडणूक आयोगावर आपली तोफ डागत टीकास्त्र सोडलं आहे.
अमरावती : ठाकरे गटाचे प्रमुख तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळ येथील पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. तर आज त्यांनी अमरावतीत सभा घेत शिंदे गटासह निवडणूक आयोगावर आपली तोफ डागत टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेले शिवसेना नाव आणि पक्षाच्या चिन्हावरून टीका केली. सध्या राजकारणात पक्ष फोडणं सुरू असून लोक पक्ष चोरत आहेत. पण चिन्ह हे निवडणूक आयोगामुळे घेऊ शकतात. तो आयोगाचा अधिकार आहे. आयोग देऊ शकतो. पण शिवसेना हे पक्षाचे नाव माझं आहे. आणि ते माझ्याचकडे राहणार. हे नाव कोणालाही देण्याचा अधिकार आयोगाला नाही असे ठाकरे यांनी ठणकावलं आहे. तर शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले होते. ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही असे म्हणताना पक्षाचे नाव बदलण्याचा आयोगाला अधिकार नाही, असे ठाकरे यांनी म्हटलं आहे.