‘उद्धव ठाकरे माझा दादा, पण…. लोकशाही जिवंत ठेवावी म्हणून’, बिनधास्त अभिजित बिचुकले कुणाला भिडले?
मी वरळीतून उभा राहिलो. पण, त्यामुळे आदित्य याचेच नाव झाले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणुकीत उतरलो. मी कुंचा मिंधा नाही. माझ्या बायकोला महिला मुख्यमंत्री म्हणून जे पाठ्म्बा देतील त्याच्यासोबत जाण्यास मी तयार आहे.
मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | काही काही लोक भीतीने निवडणूक लढले नाही. पण, मी निवडणूक लढलो. उद्धव ठाकरे यांना मी दादा म्हणतो. दादा राजकीय नेते असे वाटत नाही. चांगला माणूस नेता होऊ शकत नाही असे मी म्हणत नाही. पण, उद्धव ठाकरे सारासार विचार करतात. ते नेते म्हणून कसे आहेत हे जनतेने ठरवावे. तर राज ठाकरे आणि माझी परिस्थिती एकसारखी आहे. त्यांच्याकडे 13 आमदार आले होते आणि माझे खाते उघडायचे आहे. प्रगल्भतेचे राजकारण त्यांनी केलं असतं तर ते आणखीन पुढे गेले असते, असे परखड बोल सेलेब्रिटी अभिजित बिचुकले यांनी काढले. मात्र, मी कोणाला जवळ करत नाही. कारण मी कोणाचा मिंधा नाही. ना सातारच्या राजघराण्याला ना ठाकरे घराण्याला. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून जे माझ्या पत्नीला पाठींबा देतील त्यांच्यासोबत जाण्यास मी तयार आहे. वरळी येथून मी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उभा राहिलो. फक्त चर्चेत राहण्यासाठी मी काही असे करत नाही. उद्धव दादा आणि माझे चांगले संबंध आहेत. पण, लोकशाही आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहिलो. माझ्यामुळे आदित्यचे जास्त नाव झालं, अशी मिश्कीलीही त्यांनी केली.