उद्धव ठाकरे अपरिपक्व राजकारणी, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Sep 30, 2022 | 12:54 PM

रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

नागपूर : राज्यातील राजकारणामध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जातील आणि जे जबरदस्तीने आणले जातील ते उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्याला जातील. हा महाराष्ट्र विचारांवर चालणारा आहे जबरदस्तीने चालणारा नाही अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजकीय वक्तव्यावरून ते परिपक्व वाटत नाहीत. ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत असंही वाटत नाही. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे जमिनीवर राहून संघर्ष करू शकत नाहीत अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Published on: Sep 30, 2022 12:48 PM
बिग बॉसमध्ये जाणार का?, गुलाबराव पाटील म्हणाले…
काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून कोणाचा अर्ज; माणिकराव ठाकरेंनी दिली माहिती