सरकारी यंत्रणा वापरून केवळ प्रकल्प जबरदस्तीने कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न; सरकारवर शिवसेना नेत्याची टीका

| Updated on: May 06, 2023 | 1:07 PM

दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील सरकारवर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यांनी बारसू प्रकल्पाला समर्थन देणाऱ्यावर निशाना साधला आहे.

रत्नागिरी : उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रकल्प बळजबरीनं नागरिकांवर लादू नका अन्यथा महाराष्ट्र पेटवू असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील सरकारवर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यांनी बारसू प्रकल्पाला समर्थन देणाऱ्यावर निशाना साधला आहे. येथे जे आज मोर्चा करत आहेत. त्यांना तडीपारिची नोटीस देण्यात आली असतानाही ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर सरकारी यंत्रणा वापरून केवळ प्रकल्प जबरदस्तीने कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये खूप काही काळबेरं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री यांच्या 70 टक्के पाठिंबा लोकांचा असल्याच्या वक्तव्यावर टीका करताना, त्यांना स्थानिक परिस्थिती काय माहीत? आणि परिस्थिती माहीत असेल तर खुलेआम चर्चा का करत नाही असा जाधव यांनी केला आहे.

Published on: May 06, 2023 01:04 PM
ठाकरेंच्या स्वागतासाठी नाही तर किमान..; राणेंच्या ‘त्या’ आव्हानाची हवाच राऊतांनी काढली
Pune Bhor | हुर्ररररर… यमाई देवीच्या यात्रेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार, बघा व्हिडीओ