दहशतवादी अफझल गुरुचा ‘तो’ मुद्दा काढत उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
ज्या मुस्लिम जवानाने आपल्या देशासाठी बलिदान दिले तो आपला भाऊ नाही का ? तो आपला भाऊ आहे. कारण, तो 'भारत माता की जय' म्हणत शहिद झाला.
मुंबई : कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा मुस्लिम खतरे में है चे नारे लावत होते. आता यांचे सरकार आले आणि नारा बदली झाला ‘हिंदू खतरे मे हैं’. मग, कुणाचे राज्य चांगले होते ? जो या देशाला आपली मातृभूमी मानतो तो आमचा आहे ही शिकवण बाळासाहेबांनी दिली. ज्या मुस्लिम जवानाने आपल्या देशासाठी बलिदान दिले तो आपला भाऊ नाही का ? तो आपला भाऊ आहे. कारण, तो ‘भारत माता की जय’ म्हणत शहिद झाला. काल मोगॅम्बो म्हणाला, की मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटत होते. मग आता त्यांनी जे काही केलं तेव्हा कोण कुणाचा कोणता भाग चाटत होता ? ज्या मुफ्ती मोहम्मदने दहशतवादी अफझल गुरु याला शहीद म्हणून दर्जा द्या अशी मागणी केली. त्यांच्यासोबत तुम्ही गेलात. त्यावेळी तुम्ही हिंदू होतात ना ? की टाइम प्लिज करून काही वेळा करता बाहेर गेला होता, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.