‘तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू…,’ काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पुण्यात मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे पुण्यातील या शिवसंकल्प मेळाव्यात आज कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यात सुरु आहे. या मेळाव्याची सुरुवात करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की मी म्हणालो होतो एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. परंतू कोणाला तरी वाटलं त्यालाच बोललोय. तो लगेच म्हणाला की माझ्या नादाला लागायचं नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतले पाहीजेत मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्षं.. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाहीत. ती अंगठ्याने चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याएवढा तु कुवतीचा नाहीस अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार केली आहे.
Published on: Aug 03, 2024 02:19 PM