उद्धव ठाकरेंच्या या सभेमुळे ‘त्या’ लोकांची हातभर फाटलीय; राऊतांचा जोरदार हल्ला
मालेगावच्या सभेमुळे या लोकांची हातभर फाटलीय. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातल्या सभेबद्दल देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि उत्सुकता आहे असं राऊत म्हणाले
नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज (26 मार्च) मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी केली जात असून 1 लाखाहून अधिक नागरिक याठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ठाकरे यांच्या सभेला बाहेरून लोकं आणावे लागतात असा टोला शिंदे गटाकडून लगावण्यात आला होता.
त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवत ठाकरे यांच्या सभेचा धसका काही लोकांनी घेतला आहे. म्हणून असा अपप्रचार केला जात आहे. मात्र मालेगावच्या सभेमुळे या लोकांची हातभर फाटलीय. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातल्या सभेबद्दल देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि उत्सुकता आहे. त्यामुळे रेकॉर्डब्रेक हा शब्दही कमी पडेल इतकी मोठी गर्दी या सभेला होईल असे राऊत म्हणाले.
या सभेला भाड्याने कोणी येणार नाही. 300 आणि 500 रुपये देऊन तिकडे माणसे आणली जातात. ती नंतर उठून जातात. ही सभा तशी नसेल. ही सभा राज्याला आणि देशाला दिशा देणारी असणार आहे