‘उद्धव ठाकरे यांच्या विनंतीमुळेच मविआला पाठिंबा दिला’; बच्चू कडू यांचा खुलासा

‘उद्धव ठाकरे यांच्या विनंतीमुळेच मविआला पाठिंबा दिला’; बच्चू कडू यांचा खुलासा

| Updated on: Jul 13, 2023 | 1:32 PM

त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून वेळोवेळो गेल्या वर्षभरात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आजही त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना ११ वाजता संघटनेतील वरिष्ठ नेते आणि काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.

अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष अपक्ष आमदार बच्चू कडू हे शिंदे-फडणवीस यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून वेळोवेळो गेल्या वर्षभरात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आजही त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना ११ वाजता संघटनेतील वरिष्ठ नेते आणि काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारण आता अजित पवार यांच्यानंतर आमदार बच्चू कडू हे भूकंप करणार अशी स्थिती निर्माण झाली होती. तर ते भाजपचा साथ सोडून सरकारचा पाठिंबा काढून घेणार अशी चर्चा रंगली होती. यादरम्यान त्यांनी पत्रकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठवण काढत मविआला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी विनंती केली असं म्हणाले आहेत. तर त्यांनी शब्द पाळल्यानेच मला मंत्री पद ही मिळालं असे कडू यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 13, 2023 01:32 PM
“मंत्रिपदाचा दावा आजच सोडणार होतो, पण…”, बच्चू कडू यांनी स्पष्ट केली भूमिका
खाते वाटपावरून महायुतीत बिनसलं? शिवसेनेचा आमदार स्पष्टच म्हणाला, “सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे…”