सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवर राऊत यांचा टोला, केलं सूचक ट्वीट; म्हणाले, ‘जे जे होईल ते.. जय महाराष्ट्र!’
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपसह सोमय्या यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आक्षेपार्ह व्हिडीओवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ झाला आहे. ज्यामुळे त्यांच्यासह आता भाजपवर विरोधकांकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. तर यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भाजपसह सोमय्या यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आक्षेपार्ह व्हिडीओवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली आहे. तर आता खासदार संजय राऊत यांनी देखील सोमय्या यांचं नाव न घेता ट्वीट करत टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी, आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे:” जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका”. नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे.. जे जे होईल ते पाहत राहावे..जय महाराष्ट्र! तर यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मेन्शन केलं आहे.