“अमित शाह यांना माझा जप का करावा लागतो?”, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 20, 2023 | 10:15 AM

शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन ठाकरे गटाकडून षण्णमुखानंद सभागृहात जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. अमित शाहांना वारंवार राज्यात येऊन उद्धव ठाकरेंचा जप का करावा लागतो असा सवाल केला.

मुंबई : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन ठाकरे गटाकडून षण्णमुखानंद सभागृहात जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. अमित शाहांना वारंवार राज्यात येऊन उद्धव ठाकरेंचा जप का करावा लागतो असा सवाल केला. “उद्या गद्दार दिन आहे. या एका वर्षामध्ये त्यांनी आपलं नाव, पक्ष चोरला कागदावर, असं त्यांना वाटतं. माझे वडीलही चोरायला निघाले होते. त्यांना वाटलं आता उद्धव ठाकरेला काय किंमत उरली आहे? पण, तरीही अमित शाह यांना मुंबईत येऊन भाषणामध्ये सातत्याने उद्धव ठाकरे नावाचा जप करावा लागतो. कदाचित राम मंदिर बांधल्याचं फुकटचं श्रेय तुम्ही ढापाल, पण उद्धव ठाकरेचा जप करण्याऐवजी रामाचा जप केला, तर कदाचित तुम्हाला तो पावेल. जेवढा तुम्ही रामाचा जप करीत नाही, तेवढे तुम्ही उद्धव ग्रस्त का झाला आहात? सगळे उठून उद्धव ठाकरे… उद्धव ठाकरे करीत आहेत. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, हा समोर बसलेला उद्धव ठाकरे आहे. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोरात, पण शिवसैनिकांच्या मनातील बाळासाहेब चोरू शकत नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Published on: Jun 20, 2023 10:15 AM
मोठी अपडेट! दर्शना पवारचा खूनच? पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय सत्य आलं बाहेर? ‘तो’ कोण?
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; या मार्गावर 21 जून रोजी असणार तीन तासांचा मेगाब्लॉक