काल पक्ष अन् चिन्ह गेलं, आज ओपन कारवरून भाषण, आता पुढचं पाऊल काय? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं…

| Updated on: Feb 18, 2023 | 3:37 PM

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर निशाणा साधला. तसंच ठाकरेगटाचं पुढची रणनितीही सांगितली. पाहा...

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर निशाणा साधला. तसंच ठाकरेगटाचं पुढचं पाऊल काय असेल, तेही सांगितलं. उद्या फेसबुक लाइव्ह करेल. निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं, ते मी विस्ताराने सांगेन. तसंच येत्या काळात आपल्याला बाळासाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करायचंय. निवडणुकांच्या तयारीला लागा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेस फुटली त्यामुळे चिन्हं गोठवलं. पण दुसरं चिन्हं दिलं नव्हतं. वाद झाला तेव्हा मुख्य चिन्ह आणि नाव दिलं नाही. हा इतिहास आहे. पण पंतप्रधानांच्या गुलाम आयुक्तांनी केलं आहे. लढाई सुरू आहे. माझ्या हातात काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले.

Published on: Feb 18, 2023 03:37 PM
नरेंद्र मोदींच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही!; उद्धव ठाकरेंचं मातोश्री बाहेर जोरदार भाषण
निवडणूक आयोगाच्या निकालावर नवनीत राणा म्हणताय; जो राम, हनुमान का नही वो किसी काम का नही और…