“प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या”, उद्धव ठाकरे यांचं शिंदे सरकारला आवाहन
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. “प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला (Eknath Shinde) केलं आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय. अशात त्यांना सरकारी मदत मिळणं आवश्यक आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणालेत.
Published on: Oct 23, 2022 03:06 PM