Uddhav Thackeray on MVA Meeting | मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं? काय म्हणाले उद्धव ठाकरे?

| Updated on: Jun 07, 2022 | 11:01 PM

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी 12 अपक्ष आमदारही उपस्थित होते. या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.

मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये आज महाविकास आघाडीनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी 12 अपक्ष आमदारही उपस्थित होते. या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. सुमारे 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केलाय. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेत जाणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारच असा दावा केलाय. पत्रकारांनी आमदारांना काय संबोधन केलं असा प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. असं संबोधन सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलावलं असतं. त्याचवेळी कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीचे चारी उमेदवार राज्यसभेत निवडून जाणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

Published on: Jun 07, 2022 11:01 PM
Sanjay Raut on Rajysabha |निवडणुका तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या; तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल
विद्यार्थिनीची सोनसाखळी ओढली, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद