कसबा पोटनिवडणुकीने देशाला आशावाद दिलाय, आता परिवर्तन होणार; उद्धव ठाकरेंना विश्वास
kasba peth Assembly Election : उध्दव ठाकरे यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलंय. पाहा...
मुंबई : उध्दव ठाकरे यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकल्याचा आनंद आहे. जर कसबा मतदारसंघ इतक्या वर्षा काँग्रेस जिंकू शकतो तर देशात देखील परिवर्तन होऊ शकतं. येणाऱ्या काळातदेखील महविकास आघाडी एकत्र लढेल आणि जिंकेल सुद्धा, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल दिलासादायक आहे. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक प्रक्रिया बदलली पाहिजे. बेबंदशाही रोखण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विचार केला तर आजचा निर्णय स्वागतार्ह आहे. आमची शेवटची आशा सर्वोच्च न्यायालय आहे. आज त्या आशेला अंकुर फुटले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
Published on: Mar 02, 2023 03:09 PM