शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली; उद्धव ठाकरे म्हणतात, ‘नांदा सौख्यभरे’

| Updated on: Jul 03, 2023 | 10:09 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला. दुपारी अचानक अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शरद पवार यांच्यासाठी एक राजकीय झटका आहे. राष्ट्रवादीच्या फुटीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूकंप घडवून आणला. दुपारी अचानक अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ दिग्गज नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.हा शरद पवार यांच्यासाठी एक राजकीय झटका आहे. राष्ट्रवादीच्या फुटीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नांदा सौख्यभरे’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Published on: Jul 03, 2023 10:09 AM
“भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांचा गेम केला”, ठाकरे गटाच्या नेत्याचं टीकास्त्र
राष्ट्रवादीमधील फूटीवरून रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘याची आधीच कुणकुण’