“…तर राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती?” उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भा दौऱ्यावर आहेत.काल त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
यवतमाळ : उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भा दौऱ्यावर आहेत.काल त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. “छगन भुजबळ शिवसेनेत होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. इथपर्यंत ठिक आहे. पण, आता पक्ष संपवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवली जाते. आम्ही तुमच्यावर बोलतो. तुम्ही आमच्यावर बोला. शेवटी जे ठरवायचं ते जनता जनार्दन ठरवत असते. याला लोकशाही म्हणतात.मत कुणालाही द्या, सरकार माझंच येणार. आधी मतपेटीतून सरकार जन्माला येत होतं. आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे. आधी आमचे आमदार फोडले. अपक्षही नेले. पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची गरज होती का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
Published on: Jul 10, 2023 08:22 AM