साधा जीआर म्हणजे काय माहित नाही; रामदास कदमांवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका
रामदास कदम यांच्या गुहाघरमधून पाडल्याचा आरोप खोडून काढताना, उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्राचे एवढे दिवस वाईट आलेले नाहीत असे उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
मुंबई : रत्नागिरीतील खेडमधील गोळीबार मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रामदास कदम यांनी सभा घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित होते. त्यासभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह रामदास कदम यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना याच मातीत गाडणार असेही म्हटलं होतं. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी पलटवार केला आहे.
जाधव यांनी, रामदास कदम यांच्या गुहाघरमधून पाडल्याचा आरोप खोडून काढताना, उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्राचे एवढे दिवस वाईट आलेले नाहीत. जे रामदास कदम सारख्या माणसाला मुख्यमंत्री करतील. महाराष्ट्राचे इतके काही दिवस वाईट आलेले नाहीत. ज्याला जीआर कशाला म्हणतात ते माहित नाही. उलट रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले पाहिजेत, ऋण व्यक्त केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दोन वेळेला विधानपरिषद दिली. ते खाल्ल्या घराचे वासे मोजणारे आहेत असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.