उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांना थेट आव्हानच; म्हणाले, ‘हिंमत असेल तर हे करून दाखवा’

| Updated on: Jun 19, 2023 | 8:35 AM

कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा वगळल्यावरून फडणवीस यांनी ठाकरे यांना घेरत संबंधित प्रकरणावर तुमचं मत काय आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला. या विधानावरून उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे.

मुंबई : शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने वरळीत शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांचा खरपूस समाचार घेतला. तर कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा वगळल्यावरून फडणवीस यांनी ठाकरे यांना घेरत संबंधित प्रकरणावर तुमचं मत काय आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला. या विधानावरून उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे. ठाकरे यांनी, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच. सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. पण सावकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर फडणवीसजी, तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल, तर आपल्या देशाला स्वत:च्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर करून दाखवा असं आव्हानच त्यांनी केलं आहे.

Published on: Jun 19, 2023 08:35 AM
“संजय राऊत यांची इच्छा म्हणजे ‘इच्छा माझी पुरी करा’चा पार्ट टू”, कोणी उडवली खिल्ली?
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ​”माझी घुसमट होत होती !”