‘काल तर त्यांची मस्त पंचाईत झाली’, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

| Updated on: Jul 08, 2023 | 8:32 AM

त्याच दरम्यान महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीला देखील धक्का देत अजित पवार यांनी ९ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

मुंबई : गेल्या एक वर्षभरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवश झाले आहेत. त्याच दरम्यान महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीला देखील धक्का देत अजित पवार यांनी ९ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी ‘सध्या त्यांचे खेळ सुरु आहेत. काल तर त्यांची मस्त पंचाईत झाली आहे. ते आणि त्यांचं नशीब. आपण कोणत्या फंद्यात न पडता काम करत पुढे जायचं आहे’ म्हटलं आहे. ‘मातोश्री’वर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाध साधताना ते बोलत होते.

Published on: Jul 08, 2023 08:32 AM
नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीवर सुषमा अंधारे यांचा निशाणा; म्हणाल्या, ‘आरोग्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा… ’
आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिवसेना नेत्याची टीका; म्हणाला, ‘ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये… त्यामुळे…’