‘तेंव्हा’ मुख्यमंत्र्यांचे बाळ पाळण्यात लोळत असेल; ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची शिंदे गटावर टीका

| Updated on: Mar 11, 2023 | 12:55 PM

बाळासाहेबांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली त्यावेळेस आजच्या मुख्यमंत्र्याचे बाळ पाळण्यात लोळत असेल, त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर कोणी हक्क सांगत असेल तर ते आम्हाला काय तर कोणालाच पटलेल नाही

परभणी : उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना गेल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. परभणी येथील सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. यावेळी जाधव यांनी, शिवसेना ही ठाकरेंशिवाय नाही आणि होऊच शकत नाही असं म्हटलं आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली त्यावेळेस आजच्या मुख्यमंत्र्याचे बाळ पाळण्यात लोळत असेल, त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर कोणी हक्क सांगत असेल तर ते आम्हाला काय तर कोणालाच पटलेल नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य माणसालाही ते पटलेलं नाही, असा घणाघात जाधव यांनी केला.

Published on: Mar 11, 2023 12:50 PM
4 Minutes 24 Headlines | छाप्यावर सायरा मुश्रीफ म्हणाल्या, आम्हाला गोळ्या घालून जा
भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच; सुप्रिया सुळे आक्रमक