भाजपच्या उर्दूच्या टीकेवर राऊत भडकले; म्हणाले, या देशातील…

| Updated on: Mar 26, 2023 | 12:16 PM

मुस्लिम बांधवांनी या सभेला जास्तीत जास्त हजेरी लावावी म्हणून उर्दू भाषेत बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यावरून भाजपने टीका केली आहे

नाशिक : उद्धव ठाकरे हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला गेल्यापासून अॅक्शनमोडवर आले आहेत. ते माहाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. याच्या आधी खेड येथे आणि आता मालेगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा आज होणार आहे. तर मुस्लिम बांधवांनी या सभेला जास्तीत जास्त हजेरी लावावी म्हणून उर्दू भाषेत बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यावरून भाजपने टीका केली आहे. तर भाषणाची सुरूवातच आता उर्दूमधून करा असेही भाजपने म्हटलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उर्दूवर या देशात बंदी आहे का? एखाद्या भाषेवर बंदी आहे का? उर्दू या देशातील भाषा नाही का? कालच ऐकलं कुणी तरी जावेद अख्तर यांचं कौतुक केलं. पाकिस्तानात जाऊन या देशाची भूमिका मांडणारी जी भाषा आहे ती उर्दू आहे. ज्या जावेद अख्तरांचं कौतुक केलं, ज्या गुलजारांचं आपण कौतुक करतो ते आजही उर्दूत लिहितात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Mar 26, 2023 12:16 PM
उद्धव ठाकरे यांच्या अॅक्शनमोडवर शंभूराज देसाई यांची टीका म्हणाले, फक्त आमच्यावर…
सत्तेत बसलेले लोक कसेही वागतात, भाजप आमदाराच्या ‘त्या’ कृतीवर कारवाई व्हावी; जयंत पाटील यांची मागणी