ठाकरे गटाचा चिन्हाबाबत निर्णय कधी होणार?, अनिल देसाईंनी डेडलाईन सांगितली…
उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक चिन्हाबाबत महत्वाचं विधान केलंय. पाहा...
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक चिन्हाबाबत (Eletion Symbol) महत्वाचं विधान केलंय. आज आमची बैठक होतेय. या बैठकीत आम्ही निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ. निवडणूक आयोगाने जे पर्याय दिलेत. त्यातील पर्याय आम्ही निवडू, असं अनिल देसाई म्हणालेत. निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय आहे. आम्ही जी कागदपत्रं सादर केली आहेत. त्याचा अभ्यास करून सोमवारी एक सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. पण काल निर्णय आला. जो धक्कादायक आहे, असंही देसाई (Anil Desai) म्हणालेत.
Published on: Oct 09, 2022 11:34 AM