Shahajibapu Patil | लोकांच्या कामासाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात बंगला घेऊन मुक्काम ठोकावा, शहाजीबापूंची पुन्हा मिश्किल प्रतिक्रिया
Shahajibapu Patil | लोकांच्या कामासाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात बंगला घेऊन मुक्काम ठोकावा, शहाजीबापूंची पुन्हा मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
Shahajibapu Patil | लोकांच्या कामासाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात बंगला घेऊन मुक्काम ठोकावा, शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांची पुन्हा मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात येणार आहेत. या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्या पडण्याचा सर्वाधिक अनुभव असल्याचा टोला ही त्यांनी हाणला. आपल्याला पाडण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केला तरी पडण्याची आपल्याला भीती नसल्याचे ते म्हणाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा व्हायला हवा असे ते म्हणाले. आपण तळागळातून आल्याचे सांगत खोक्याची संस्कृती आपली नसल्याचे ते म्हणाले. तसेच सत्ता गेल्याने विरोधक (Opposition) सैरभैर झाल्याची टीका ही त्यांनी केली.