नरेंद्र मोदींच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही!; उद्धव ठाकरेंचं मातोश्री बाहेर जोरदार भाषण
उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदेगटासह भाजपवर निशाणा साधला. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर ओपन कारमधून जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदेगटासह भाजपवर निशाणा साधला. भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल यंत्रणा हाताशी घेऊन पक्ष संपवता येईल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही, असं ठाकरे म्हणालेत. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील, असं ते म्हणाले. शिवसेना कुणाची. शिवसेना ही जनतेला ठरवू द्या. यांचा डाव सुरू आहे. यांना ठाकरे नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले. खचलो नाही, खचणार नाही. तुम्हा शिवसैनिकांच्या ताकदीवर मी उभा,असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांमध्ये जान भरली.
Published on: Feb 18, 2023 03:18 PM