धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, चोरलल्या चिन्हावर निवडून येऊन दाखवाच!; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान

| Updated on: Feb 18, 2023 | 3:05 PM

काल शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाला मिळालं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. पाहा व्हीडिओ...

मुंबई : काल शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदेगटाला मिळालं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी ओपन कारमधून भाषण केलं. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. बाळासाहेब ठाकरेंनीही 30 ऑक्टोबर 1968 ला बाळासाहेब ठाकरेंनी जीपवर उभं राहत भाषण केलं होतं. त्याची आठवण यावेळी शिवसैनिकांना आली. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

“नरेंद्र मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने सुरू आहे. मशालही काढतील. माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Published on: Feb 18, 2023 02:52 PM
धनुष्यबाण चिन्हानंतर आता मशाल चिन्ह ही जाणार? ‘या’ पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन
शिंदे गटाकडून ठाकरे गटाची कोंडी? शिवसेनेची कार्यालये तब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू