उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान, मातोश्रीबाहेर झळकले बॅनर
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान मुंबईमध्ये मातोश्री परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भावी पंतप्रधान अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत.
मुंबई, 24 जुलै 2023 | राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान मुंबईमध्ये मातोश्री परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भावी पंतप्रधान अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत. उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसासानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवस्थानाबाहेर कलानगर परिसरात अशाप्रकारची बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे त्यांना यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलं आहे.
Published on: Jul 24, 2023 12:39 PM