आमचे पक्ष आणि विचारधारा वेगवेगळ्या… मात्र, वादाला प्रतिवादाने उत्तर दिसलं पाहिजे : थोरात
थोरात यांनी, काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले आहेत. नक्कीच आमचे पक्ष आणि विचारधारा वेगवेगळ्या आहेत असे म्हटलं आहे
अहमदनगर : उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही अलबेल दिसत नाही असे दिसत आहे. ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाना साधत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही असे सांगितलं आहे. त्यानंतर यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी, काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले आहेत. नक्कीच आमचे पक्ष आणि विचारधारा वेगवेगळ्या आहेत. मात्र सर्वसामान्य माणसाला केंद्र मानून आम्ही किमान समान कार्यक्रमावर काम करतोय. सावरकरांच्या मुद्यावरून बोलायचंच झालं तर वाद असेल त्याला प्रतिवादाने दिलं पाहिजे, असेही थोरात म्हणाले.
Published on: Mar 27, 2023 02:57 PM