संजय राऊत यांची सरकारसह राज ठाकरेंवर टीका म्हणाले, ही पडद्यामागची पटकथा…
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतोय याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बगलबच्चे हादरलेले आहेत
नाशिक : आधी राज्यातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरे जायचे. ही पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पटकथेवरून राज ठाकरेंसह शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तर उद्धव ठाकरेंना घाबरल्यामुळे या हालचाली सुरु असल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला.
या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरे जायचं असं एक पडद्यामागची पटकथा लिहिली जात आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतोय याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बगलबच्चे हादरलेले आहेत. त्यामुळेच आमच्याशी सामना करण्यासाठी जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचे कारस्थान दिसत आहे. ही पडद्यामागची फटकथा लोकांपर्यंत पोहोचलेली आहे असेही राऊत म्हणाले.