“इर्शारवाडीच्या बाजूला असलेल्या वस्त्यांसाठी योजना करा”, उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारला सूचना
इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला. तसेच अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरेंनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रायगड, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला. तसेच अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकार कोणाचेही असो, पण यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. आज मी सरकारकडे जनतेचं सरकार म्हणून पाहतो. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी मोठी योजना राबवावी. अशा धोकादायक वसत्यांच्या तेथील नागरिकांशी चर्चा करून स्थलांतर करायला हवं आणि तीन चार वसत्या मिळून एखादं गाव वसवलं जाऊ शकतं. दुर्घटनाग्रस्त लोकांना कंटेनरमध्ये ठेवण्यापेक्षा जिथे उदारनिर्वाहचे साधन आहेत तिथे हे कंटेनर ठेवायाल हवे. पंतप्रधान आवास योजनेसारखी योजना जाहीर करावी, तातडीने ही योजना आखली गेली पाहीजे. सरकार बदलले तरी यात खंड येऊ नये.