निलमताई शिवसेनेच्या विचाराच्या नव्हत्या – उद्धव ठाकरे

| Updated on: Aug 21, 2022 | 4:37 PM

नीलमताईनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व कधीही अर्ध्यात सोडली नाही . प्रत्येक ठिकाणी त्यांना बऱ्याचदा असं होतं की मी काही सांगण्याच्या आधीच नीलम ताईचा फोन येतो की अशी घटना घडली आणि आता मी तिथूनच बोलते म्हणजे अशीही वृत्ती ही क्वचित एखाद्या महिलेत बघायला मिळते असेच कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.

मुंबई – निलमताई पूर्वी शिवसेनेच्या (shivsena)विचाराच्या नव्हत्या. एक सामाजिक कार्यकर्ती , चळवळीतील कार्यकर्ती आणि मुळामध्ये एक चळवळी महिला अशी त्यांची ओळख होती. एका दिवशी मला निरोप आला कि नीलमताई गोऱ्हे(Nilam gorhe)यांना आपल्याला भेटायचे आहे. त्या तर आपल्या विचारांच्या नाही,त्याना भेटून काय करायचे. त्यांना भेटलो एक दोन अडीच तास त्यानी मला वेगवेगळ्या प्रश्नविचारून भंडावून सोडलं . दुसऱ्या दिवशी फोन आला काल तुमच्याशी मी चर्चा केली आणि मी शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही मला शिवसेनेत प्रवेश द्या. त्यानंतर नीलमताईनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व कधीही अर्ध्यात सोडली नाही . प्रत्येक ठिकाणी त्यांना बऱ्याचदा असं होतं की मी काही सांगण्याच्या आधीच नीलम ताईचा फोन येतो की अशी घटना घडली आणि आता मी तिथूनच बोलते म्हणजे अशीही वृत्ती ही क्वचित एखाद्या महिलेत बघायला मिळते असेच कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केलं.

Published on: Aug 21, 2022 04:37 PM
चंद्रशेखर बावनकुळे अभिमन्यू सारखं बडबडू नका, कारण तुमचा केव्हाच घटतकोच केला आहे- सचिन खरात
महिला अत्याचाराच्या बाबतीत जात पात येता कामा नये -उद्धव ठाकरे