Arvind Sawant | उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, खासदार अरविंद सावंत यांची पुन्हा बंडखोरांवर टीका
Arvind Sawant | बंडखोर आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका शिवसेनेचा खासदार अरविंद सावंत यांनी केली.
Arvind Sawant | बंडखोर आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका शिवसेनेचा खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली. भविष्यात किती वादळं, संकटं येऊ द्या; आपण उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यासोबत कायम राहणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्यासारखा सज्जन, संयमी, सौजन्यशील सारखे व्यक्तिमत्व राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभले होते. चांगला मुख्यमंत्री त्यांना पोचपावतीही मिळाली होती. अशावेळी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठिशी कणखरपणे उभे राहणे हेच आमचे कर्तव्य असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. गेल्या दोन अडीच महिन्यात सातत्याने शिवसेनेतील आमदार, खासदार आणि सामना वृत्तपत्रातून बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि खासदारांचा खरपूस समाचार घेण्यात येत आहे. या बंडाळीविरोधात पावसाळी अधिवेशनही दणाणून गेले होते.