‘2024 पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील’; गृहमंत्र्यांनी केलं स्पष्ट

| Updated on: Jun 04, 2022 | 11:04 AM

त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात अपक्ष आमदारांना चांगले दिवस आले आहेत. छोट्या पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार कुणाला मतदान करतात हे १० जूनला स्पष्ट होईल

राज्यसभेची निवडणुक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये अपक्ष मतदारांना आपल्याकडे घेण्यासाठी चुरस लागली लागली. त्याच अनुशंगाने महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय २०२४ मध्ये उद्धव ठाकरे हेचं मुख्यमंत्री असंही ते म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या विधानानंतर वळसे पाटील यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून घोडे बाजार होणार अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात अपक्ष आमदारांना चांगले दिवस आले आहेत. छोट्या पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार कुणाला मतदान करतात हे १० जूनला स्पष्ट होईल.

Published on: Jun 04, 2022 11:04 AM
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय काळजी घ्या – अजित पवार
पुढील काळात राज्यात मुख्यमंत्री हा आपलाच असेल, धनंजय मुंडेंचं वक्तव्य