सत्तांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंचा ‘इथे’ जाहीर मेळावा, बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार

| Updated on: Sep 21, 2022 | 8:49 AM

ज्या परिसरात हा मेळावा होतोय, तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत... असं यावर लिहिलंय.

मुंबईः शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज प्रथमच गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) या मेळाव्याच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतल्या गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.  राज्यातील सत्तांतरानंतर गटप्रमुखांना एकत्रितपणे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे संबोधणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यंदा शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाहीये. त्यामुळेही आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, ज्या परिसरात हा मेळावा होतोय, तेथील माजी नगरसेवकांनी मेळाव्यासाठी खास प्रकारचे टीशर्ट तयार केले आहेत. उद्धव साहेब आम्ही तुमच्यासोबत… असं यावर लिहिलंय.

 

Published on: Sep 21, 2022 08:49 AM
Video | रात्री रेल्वे रुळावरून घसरली, कुठे घडली घटना?
तेजस ठाकरे दसरा मेळाव्यातून राजकारणात एन्ट्री करणार?, पोस्टर व्हायरल