video | उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्याला समन्स, काय प्रकरण

| Updated on: Mar 04, 2024 | 12:51 PM

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्ताधारी भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या विश्वासू नेत्यांवर केंद्रीय यंत्रणामार्फत समन्स पाठविण्याचा सिलसिला कायम सुरुच ठेवला आहे. आता ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासु नेत्याला मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

Follow us on

मुंबई | 2 मार्च 2024 : शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार अनिल देसाई यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खात्यातून 50 कोटीचा निधी काढला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू अनिल देसाई यांना समन्स बजावत येत्या 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नुकतेच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव घेता टीका केली होती. आम्हाला 50 खोके म्हणणाऱ्यांनी आमच्या खात्यातील पन्नास कोटी घेतल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना आमच्याकडे आहे. धनुष्यबाण देखील आमच्याकडे आहे. खोके पुरत नाही…अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.