Devendra Fadnavis Speech | ‘मैदाच्या पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री’
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला रविवारी फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका', असा इशाराच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.
मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेची युती तुटली आणि महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झालं. तेव्हापासून राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात टीका आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. शनिवारी बीकेसीतील मैदानातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बाबरी मशिद आणि फडणवीसांच्या वजनावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांना जोरदार टोला हाणला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला रविवारी फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका’,असा इशाराच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.