उद्धव ठाकरे गटाची याचिका, शिंदे गटाचे आमदार म्हणतात, ‘सुप्रीम कोर्ट देखील निर्णय…’
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरून विधानसभा अध्यक्ष यांच्या कोर्टात चेंडू आहे. तुमचा विधानसभेवर विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावं? असा टोला शिंदे गटाच्या आमदारांनी लगावला.
संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षा यासंदर्भात ठाम भूमिका घेतली आहे. त्यावर योग्य असा निर्णयही दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला ठाम विश्वास आहे की, सुप्रीम कोर्ट देखील हा निर्णय बदलू शकत नाही असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी केली आहे. त्यावर, संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू आहे. तरी देखील ठाकरे गटाला यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार पुनर्विचार याचिका केली जात आहे. पण. जी सुप्रीम कोर्टात याचिका टाकली जात आहे त्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्यामुळे विधानसभेवर तुमचा विश्वास आहे की नाही हे त्यांनी सांगावं? असा टोलाही त्यांनी लगावला.