पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्या पानांना झडलेली आणि सडलेली पानं म्हटली आहेत त्या पानानीच सत्ता काबीज केली आहे असं म्हणत त्यांनी पलटवार मारला.
राज्यात बंडखोरी नाट्य घडून गेल्यानंतर बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर काल खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत बंडखोर शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांनी टीका करताना ज्यांनी बंडखोरी केली आहे, ती सडलेली, आणि झडलेली पानं होती, झाड सडलेल्या पानं सोडून देतं, तसं या पानांनी झाडाकडून भरुन घेतलं आहे आता झाडाला सोडून दिलं आहे अशी टीकाही त्यांनी एकनाथ शिंदे गटावर केली. यावेळी त्यांनी टीका करताना बंडखोर आमदारांनी सगळं मिळाल्यानंतर ते कसे दुसऱ्या गटात कसे गेले यावरही त्यांनी बोचरी टीका केली. त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्या पानांना झडलेली आणि सडलेली पानं म्हटली आहेत त्या पानानीच सत्ता काबीज केली आहे असं म्हणत त्यांनी पलटवार मारला.
Published on: Jul 26, 2022 09:01 PM