शिवसेनेच्या 16 आमदरांचं भविष्य काय? पाहा काय म्हणाले उज्ज्वल निकम…
शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
नागपूर : शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली. या नोटिशीचे उत्तर दोन आठवड्यात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हे आदेश दिले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. उज्ज्वल निकम काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 14, 2023 02:22 PM