“महाराष्ट्रात पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या”, राष्ट्रवादीतील बंडावर उज्ज्वल निकम म्हणतात…

| Updated on: Jul 04, 2023 | 9:21 AM

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. बंडखोरी करत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणार ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.

सांगली – शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. बंडखोरी करत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणार ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये खेळ बघितला, तो नव्याने नवा अध्याय, नवा भिडू यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. याबाबत आता विधानसभा अध्यक्षांना अधिकार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत विहित कालावधीत निर्णय घेतला पाहिजे.”

Published on: Jul 04, 2023 09:21 AM
संजय राऊत यांच्यावर कोणाचे टीकास्त्र? म्हणाला, ‘चिठ्ठी काढणारा पोपट’
बंडानंतर पहिलं लक्ष्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचा नेता म्हणतो, “हे बडवे पक्षाची दिशाभूल करत आहेत…”