राज्यपाल कोश्यारी यांनी काय काय केलं ? कायदेविधिज्ञ उल्हास बापट यांनी दिले ‘हे’ दाखले
घटना आणि कायद्यानुसार राज्यपाल यांनी वागणे अपेक्षित आहे. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल यांनी वागायला हवे. त्यांना अधिकार फार कमी आहेत. सत्र कधी बोलवायचे हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री ठरवतात. पण...
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी महत्वपूर्ण आहे. कारण, यात जो काही निर्णय लागणार आहे तो देशातील सर्व राज्यांना लागू होणार आहे. त्यामुळे त्यावर लवकर सुनावणी होणार नाही कदाचित ७ खंडपीठ यांच्याकडे ही याचिका जाऊ शकते अशी शक्यता कायदेविधिज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केली आहे. घटना आणि कायद्यानुसार राज्यपाल यांनी वागणे अपेक्षित आहे. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल यांनी वागायला हवे. त्यांना अधिकार फार कमी आहेत. सत्र कधी बोलवायचे हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री ठरवतात. पण, राज्यपाल यांनी अनेकवेळा घटनाविरोधी कृत्य केली. १२ सदस्य यादीला उशीर केला. तर, चौकशी न करता अजित पवार यांच्या शपथविधी केला, अशा अनेक चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या असे ते म्हणाले.
Published on: Feb 14, 2023 12:41 PM