तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं अत्यंत महत्वाचं वक्तव्य
Ulhas Bapat : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रया दिली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
पुणे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. “जर आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री देखील अपात्र होतील. सध्या राज्यात कुणाकडेच बहुमत नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे”, असं उल्हास बापट म्हणालेत. “राजकीय लोकांनी आता मॅच्युरिटी दाखवली पाहिजे. ते मॅच्युरिटी दाखवत नाहीत म्हणून अशी प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे जातात. निकाल लवकरात लवकर लागणं अपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढील आठवड्यात येणे आवश्यक आहे. कायद्यानुसार हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच जायला हवं आणि तसेच होईल कारण कायदाच सांगतो. या बाबी विधानसभा अध्यक्षच ठरवू शकतात. निकाल आज येणं अनपेक्षित सुनावणी दोन दिवस सुरू राहील. सरकार घटनात्मक आहे की नाही हे लवकरात लवकर ठरलं पाहिजे”, असंही बापट म्हणाले आहेत.
Published on: Mar 14, 2023 12:20 PM