Ulhasnagar Bike fire | तापमानात वाढ झाल्याने दुचाकीला भररस्त्यात आग
एकीकडे इलेक्ट्रीक दुचाक्यांना (Ola Electric Bike) आग लागण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळे लोक धास्तावले आहेत. पण फक्त इलेक्ट्रीक कारच नव्हे, तर कार आणि दुचाक्यांनाही कोणत्याही क्षणी आग लागू शकते. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) घटनेनं ही बाब अधोरेखित केली आहे.
उल्हासनगर : एकीकडे इलेक्ट्रीक दुचाक्यांना (Ola Electric Bike) आग लागण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळे लोक धास्तावले आहेत. पण फक्त इलेक्ट्रीक कारच नव्हे, तर कार आणि दुचाक्यांनाही कोणत्याही क्षणी आग लागू शकते. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) घटनेनं ही बाब अधोरेखित केली आहे. रॉयल इनफिल्डवरुन (Royal Enfield) जाणारा एक दुचाकीस्वार त्याच्या बुलेटला आग लागल्यामुळे चांगला घाबरलाय. इतका की त्यानं बाईकच जागच्या जागी सोडून दिली आणि पळ काढला. आधी या बाईकमधून धूर येत असल्याचं दिसून आलं. धूर येताना दिसतोय म्हणून एक इसम या माणसाला सांगायला आला. इंजिनमधून धूर येत असल्याची पुसटशीही कल्पना या बुलेटस्वार व्यक्तीला नव्हती. धूर येत असल्याचं कळताच, या बुलेटस्वारानं बाईकच जागच्या जागी सोडून दिली. त्यानंतर बघता बघता बुलेटनं पेट घेतला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.