Ulhasnagar Robber Arrested | मंदिरात दरोडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी शिताफीने केली अटक
Ulhasnagar Robber Arrested | उल्हासनगरमध्ये मंदिरात दरोडा घालणाऱ्या टोळीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.
Ulhasnagar Robber Arrested | उल्हासनगर (Ulhasnagar)पोलिसांनी जिगरबाज कामगिरी केली आहे. त्यांनी उल्हासनगर परिसारातील मंदिरांवर दरोडा (Temple Robbery) घालणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरोडा घालून दहशत माजवणाऱ्या या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. 8 पैकी 4 दरोडेखोरोना विठ्ठलवाडी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या टोळीच्या म्होरक्यावर यापूर्वी 18 गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर मोक्कासह अन्य गुन्ह्यांची नोंद आहे. या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह सोनंही पोलिसांनी हस्तगत केले आहे. 30 ऑगस्ट 2022 रोजी आरोपींनी मंदिरात दरोडा घातला होता. या संपूर्ण घटनाक्रमांची आणि पोलिसांनी कसून चौकशी करुन आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Published on: Sep 10, 2022 03:55 PM