Video : टाईट शेड्यूलमधला एक स्वच्छंदी क्षण! उल्हासनगरमध्ये पोलिसांचा संबळ अन् डीजेच्या तालावर दिलखुलास ठेका

| Updated on: Jun 13, 2022 | 11:26 AM

Ulhasnagar News: उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला.

उल्हासनगर : उल्हासनगरात (Ulhasnagar Police) एरव्ही कायम बंदोबस्तात, नाकाबंदीत किंवा गुन्ह्यांची उकल करण्यात व्यस्त असणारे पोलीस मात्र चक्क डीजे अन संबळच्या तालावर मुक्तपणे नाचताना पाहायला मिळाले. याचं कारण होतं, ते म्हणजे पोलिसांच्या (Ulhasnagar Police Dance video) वतीने आयोजित करण्यात आलेला ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रम. आपल्या रोजच्या तणावपूर्ण आयुष्यातून एक दिवस आपल्याला तणावमुक्त अन स्वच्छंदीपणे जगता यावं, यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने ‘हॅप्पी स्ट्रीट’ या उपक्रमाचं आयोजन केलं जातंय. उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासह आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी देण्यात आली. विशेष म्हणजे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह उल्हासनगर परिमंडळ 4 मधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी हे यावेळी स्वच्छंदीपणे आणि मुक्तपणे गाण्याच्या तालावर (Police Dance video) नृत्य करताना पाहायला मिळाले. तर अनेक पोलिसांनी झिंगाट, संबळच्या तालावर ठेका धरला. असे उपक्रम आपल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात महत्त्वाचे असल्याचं यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितलं.

Published on: Jun 13, 2022 08:00 AM
Ajit Pawar on Media | अजित पवारांचा पत्रकारांना प्रश्न, तुम्ही पण कधी तरी खरं बोलायला शिका ना
NCP Meeting : शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक! पुढची रणनिती ठरणार?