देशभरात एक प्रकारचं अशांततेचं वातावरण निर्माण केलं जातयं; एकनाथ खडसेंचा घणाघात
राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देशभरात एक प्रकारचं अशांततेचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचं म्हटलं आहे. तर अलीकडच्या कालखंडात संपूर्ण देशांमध्ये जाती जातीमध्ये तणाव वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी दंगली झालेले आहेत
मुक्ताईनगर/जळगाव : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतीक आणि अशरफ या दोघांना मेडिकलसाठी पोलिस नेत असतानाच या दोघांवर गोळीबार झाला. या भयानक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या सरकारवर विरोधक टीका करत आहेत. यादरम्यान त्याचे पडसाद राज्यातही दिसत आहेत. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी देशभरात एक प्रकारचं अशांततेचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचं म्हटलं आहे. तर अलीकडच्या कालखंडात संपूर्ण देशांमध्ये जाती जातीमध्ये तणाव वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी दंगली झालेले आहेत. हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले आहेत. हिंदू मुस्लिम असेल की अन्य असेल यांच्यात दंगली घडून अशांतता पसरली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण कोणीतरी निर्माण करतय. वेळीच आपल्याला पायबंद घातलं पाहिजे, अशा रीतीने जर देशभरच उद्रेक झाला तर पुढे आवरणे कठीण जाईल अशी प्रतिक्रिया खडसे यांनी प्रयागराज येथे घडलेल्या घटनेवर ती दिली आहे.