भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाची किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूर, 19 जुलै 2023 | भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ निश्चितपणे खेदजनक आहे. समाजातील अनैतिकतेच्या विरोधात आक्षेप घेऊन सरकारी यंत्रणाकडे रीतसर तक्रारी करून शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करणे, अशी ख्याती सोमय्या यांची होती. मात्र सार्वजनिक जीवनात इतरांच्या नैतिकतेवर आरोप करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनात नैतिकता जपणे ही आवश्यक बाब असते.सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओ वरून जे वर्तन दिसतंय त्यामुळं त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल आश्वासन दिलेय. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”