अखेर बुल्डोझर चालला! जेसीबीची काच फोडली, पोलीसांकडून धरपकड आणि दंगल नियंत्रण पथकाची कारवाई

| Updated on: May 30, 2023 | 12:53 PM

त्यातच आज नाशिक शहरातील फुलेनगर परिसरातील डावा कालवा येथील अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथकाची मदत घेण्यात आली.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे. त्यातच आज नाशिक शहरातील फुलेनगर परिसरातील डावा कालवा येथील अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथकाची मदत घेण्यात आली. तर चोख बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान इथल्या रहिवाशांना झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. तर याकारवाई वरून स्थानिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी अतिक्रमण काढण्यास गेलेल्या जेसीबीची काच फोडली. त्यामुले काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं.

“…त्यावेळी बाळू धानोरकर यांनी मला साथ दिली होती”, विजय वडेट्टीवार यांच्याकडून आठवणींना उजाळा
‘2019 ला मोदींची लाट असूनही त्यांचा विजय झाला’, अजित पवारांकडून बाळू धानोरकरांच्या आठवणींना उजाळा